नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

गझल: शेत्करी उप-भोगणारा !

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

मीच आहे, छान हे जे, शेत येथे, फुलवणारा
पण तरी ही, नाडलेला, शासनाने, लूटलेला

एकदा मी, जात असता, लगबगीने, तोल गेला
गफलतीने, पाय तुटला, पंगु झालो, पायश्याला

नाच गाणे, ठिक आहे, पण प्रमादी, ते नको ते
जागृतीने, मस्त मज्जा, येत असते, उत्सवाला

एकट्याने, बैलगाडी, पाहिली का, पार जाता
भार माझा, तोलतो मी, साध तू त्या, शंकराला

शेत्करी हा, राज्यकर्त्या, भोगणारा, होय का रे ?
शेत्करी उप,- भोगणारा, शेतमालक, या मळ्याचा !

Share

प्रतिक्रिया

 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  सोम, 05/03/2018 - 22:51. वाजता प्रकाशित केले.

  ह्या शेरच्या माध्ममाने, नैसर्गिक कायदा दाखवून देण्याची हिम्मत करण्यात आली आहे, की भोगणारा हा एकमेव कर्ता करविता देव (अस्तित्व) असून लोकं हे मग ते कोणीही असोत, उप-भोगणारे आहेत. त्यामुळे शेतकरी हा भोगवटदार नसून उप-भोगकर्ता म्हणजेच पर्यायाने मालक आहे! त्याच प्रमाणे सदर गझलेचा पहिला शेर हा ही काही कमी नाही !!

  Dr. Ravipal Bharshankar


 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  बुध, 07/03/2018 - 12:06. वाजता प्रकाशित केले.

  अप्रतिम गझल भारपाल सर

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक