नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

एक आहे रे समेला

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
मराठी गझल

मीच येथे हरवलेला
मी तुला शोधू कशाला

भार माझा तोलतो मी
साध तू त्या शंकराला

चांदने मज राखते अन
झोप येते की उश्याला

कोण आहे कोण नाही
जन्म देते उद्भवाला

बारस्याला अर्थ नाही
पाहतो मी आपल्याला

शेत माझे राखतो मी
अन्न पाणी मिळवण्याला

जीव माझा तो तुझा ही
एक आहे रे समेला

Share