नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

शेतकऱ्याची क़ैफ़ियत

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
कविता

आपला हिस्सा दुसऱ्यास घालेल, स्वतः खाणार नाही
अन्नदाता तो मग कसा भूका मरणार नाही

दलाल ठरवेल जोपर्यंत शेतमालाचे दाम
लिहून देतो तोपर्यंत शेतकरी कधीच तरणार नाही

शेतकऱ्यासही घ्यावा लागेल विष्णूचा अवतार
नाही तर काही वामन बळीचं मुंडकं सोडणार नाही

शेतकरी गज़ल देखील जर मुसल्सल नसेल
तर मग शेतकऱ्याची क़ैफ़ियत येथे कोणीच ऐकणार नाही

Share

प्रतिक्रिया