नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

झोपेच्या घाती

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
कविता

स्वप्न पेरता शेतकऱ्याने दुःखच हाती येईल
आनखीन काय पिक झोपेच्या, घेता घाती येईल

तंद्री मध्ये असाच रंगे जीवनाचा खेळ खंडोबा
भान मस्तकी ठेवा हो बळी, भले न करता शेती येईल

भाव म्हणाले भावाने का पोट हे भरते सांगा
किंमत मोजा म्हणा जनांना, कामी पैका येती येईल

काळी आई पाढंरे बाबा, लईच झाले आता
सारेच माती आहे म्हणून काय खाता माती येईल

जय जवान जय किसान म्हणोनि लुटतात घरचेच
शेतकरी आणि जवान ह्यांना केंव्हा मती येईल

Share

प्रतिक्रिया