स्वतंत्र भारत

PREMRAJ LADE's picture
काव्यप्रकार: 
कविता

स्वतंत्र भारत माते, केलीस तू कमाल
अधिकारी ,पुढारी, ठेकेदार,केले मालामाल
एजन्सी वाल्यांचे कमिशन वाढले
साहेबांचे पगार गगनाला भिडले
भावासाठी शेतकरी आंदोलन करतो
बंदुकीच्या गोळ्यां त्यांच्या डोक्यात घालतो
कामगार मागतो कष्टाची मजुरी
मालक, मात्र त्यांना पाठवितो घरी
लाचखोर, भ्रस्टाचारी, स्वातंत्र्य भोगतो
इमानदार,कर्तबगार गुलामीत जगतो
काय यालाच म्हणावी लोक शाही
शाही लोकांची चाले तांनाशाही

कवि....
प्रेमराज लाडे
दी..11/1/2018