नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

भाकर

Rangnath Talwatkar's picture
काव्यप्रकार: 
कविता

भाकर

का पळते भाकर
पोटाला पाहून दूर
कधी ओसरेल माझ्या
अग्नीचा या धुर

किती कष्ट केले रानी
किती गायली रे गाणी
तुला विनवीले रे मेघा
रानी पाडण्या रे पाणी

कितीदा रचले
रचुनी खचले
उभ्या पीकात रे माझ्या
बोंडअळीचे ढीग रे साचले

फिरलो बाजारी बाजारी
डोंगर घेवूनी दु:खाचा
थकलो चालुनी चालुनी
मार्ग पाहता सुखाचा

भुक लागली या पोटा
खळगी भरण्या निघालो
फाटक्या या आयुष्याला
पुन्हा जोडण्या निघालो

आता हरणार नाही
आता मरणार नाही
लढा लढण्या निघालो
आता थांबणार नाही

- रंगनाथ तालवटकर
वर्धा
७३८७४३९३१२

Share