शेतकरी राजा

PREMRAJ LADE's picture
काव्यप्रकार: 
कविता

शेतकर्‍याला राजा म्हणूणी थट्टा त्याची चालली
या राजाची थट्टा पहा कुठे कसी केली
राजा म्हणूणी सन्मान याचा होतोका काही
सरकार दरबारी किममत याची तसूभरनाही
रामा, गोमा म्हणूणी त्यासी हाक मारतो एक चपरासी
शंभर हेल्पाट्या माराव्या लागतो साहेबाच्या पासी
व्यापारी दलाल पहा मिळूणी याला सदा ठकवितो
याच्या मालाचा भाव लावूनी यालाच पहा नागवितो
उत्पादनाचा खर्चही निघेना होतो शंभराचे साठ
या राजाला सदा पडतो सावकारासी गाठ
अन्न पिकवूणी त्याला मिळेना पोटभरी खाया
पिक घरी आल्या आल्या पहा सावकार येतो न्याया
ब्यांकेचेही नोकर याला पहा धमकावूणी जातो
तेव्हा मात्र याच्या चिंतेला पारावार नसतो
काय करावे कुठे जावे समजेना याला
तेव्हा मात्र शेतकरी राजा कवटाळी मृत्युला
सदा कर्जाचे ओझे राहतो पहा याचे डोही
सेवट होतो कर्ज ठेऊणी डोही मुलांच्याही
अन्न पिकवूणी पोसींद्याची दैना असी होतो
या राजाचा संसार पहा उघड्यावर पडतो;

date :- 07-01-2018