४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी
नोंदणीची अंतिम मुदत : 20 डिसेंबर २०१७
नमस्कार,
चवथ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायऱ्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.
नियम, अटी आणि सूचना :
-
शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणाऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने सहभागींना मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
-
सर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे.
-
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ शेतीमातीशी बांधिलकी राखणार्यांची असावी, तिथे व्यक्तिगत अहंभावनेला थारा नसावा.
-
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे सर्व कामकाज पारदर्शीपणाने व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो.
-
प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाईल.
-
निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.
-
फॉर्म भरताना आपला प्रतिनिधी सहभाग नोंदणी क्रमांक लिहिणे आवश्यक असल्याने प्रतिनिधी सहभाग नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून घ्यावी. अधिक माहिती http://www.baliraja.com/rep-2018 येथे उपलब्ध आहे.
-
कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्यात सहभागी होऊ इच्छीणार्या कवी आणि गझलकारांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी. काही तांत्रिक अडचण आल्यास abmsss2015@gmail.com या विरोपाव्दारे (इमेल) किंवा बळीराजावरील व्यक्तिगत निरोपाच्या माध्यमातून आमचेशी संपर्क साधावा.
*Ad* नंतरच खालील लिंकवर क्लिक करा. *Ad*
**********
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2018A या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
**********
Comments
४ थे अ.भा.मराठी शेतकरी
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
निवेदन
आपली प्रतिनिधी नोंदणी आणि कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते शतप्रतिशत खरेही आहे, हे मान्य आहे. पण गंमत अशी आहे कि नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य असली कि धडाधड लोक बुकिंग करून टाकतात. सभागृहाची क्षमता १००० आसनांची असेल तर दोन दिवसात बुकिंग हाऊसफुल्ल होऊन जाते. मात्र कार्यक्रमाला फक्त २०० लोक येतात आणि ८०० खुर्च्या शिल्लकी राहतात.
आम्ही अनेक कवी संमेलने पाहिली आहेत कि कार्यक्रमपत्रिकेत कवी म्हणून नावे असलेल्यापैकी २० टक्के कवी सुद्धा प्रत्यक्षात हजर राहत नाहीत. मग बिचारे आयोजक उपस्थितांपैकी कविंना वेळेवर संधी देऊन कार्यक्रम साजरा करून घेतात.
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या मते ही बेशिस्त सारस्वतांना शोभादायक नाही. इतरत्र जे घडत आले ते अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्यक्रमात घडू नये, अशी प्रामाणिक इच्छा असल्यानेच ४ थ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनासाठी किचकट असली तरी शिस्त पाळली जाईल अशी आणि संमेलन यशस्वी होईल अशी कार्यपद्धती अंगिकारण्याचे निश्चित करण्यात झाले आहे.
आपले सहकार्य मिळेलच याची खात्री आहे.
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1190 येथे भेट द्या
शेतकरी तितुका एक एक!
Needs to present Poem on Farmer Sucide
Please give me chance to present my poems on Farmers sucide in Vidharbha
प्रतिनिधी नोंदणी
प्रतिनिधी नोंदणी केली आहे काय ?
शेतकरी तितुका एक एक!
कवी संमेलन/गझल मुशायरा,
कवी संमेलन/गझल मुशायरा, नोंदणी आजपासून थांबवण्यात आली आहे. :R:
शेतकरी तितुका एक एक!
मला एक कळलेले नाही कि, अनेक
मला एक कळलेले नाही कि, अनेक कवी व गझलकारांनी कवी संमेलन/गझल मुशायऱ्यासाठी थेट नोंदणी केली पण प्रतिनिधी नोंदणी केलेलीच नाही. जर त्यांची निवड केली तर ते रचना कुठे सादर करतील? सभागृहाच्या बाहेर प्रांगणात? कि रोडवर?
शेतकरी तितुका एक एक!
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings