आस

Rangnath Talwatkar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

आस
काळ्या आईच्या कुशित
बीज निजली दमानं
वर आकाशी दुष्काळ
पाऊस झाला बेईमान

कारं वागतो तू असा
मन झालं येडापिसा
काही कळे ना रे मला
झाला रिकामा हा खिसा

किती वाट तुझी पाहू
तुझ्याविना कसा राहू
गळा कोरडा हा माझा
तुझे गित कसे गाऊ

जीव घेवून मुठीत
पावसा तूला रे विनीत
कसं सोडवू तुझ्याविना
माझ्या शेतीचं गणित

पोर आहे रे उपाशी
बायको रडते दाराशी
नको दूर जावू असा
दया करना रे जराशी

नको समजू तु भास
आहे शेवटची आस
दगा दिलास पावसा
गळ्या लागेल रे फास
गळ्या लागेल रे फास

-रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि.वर्धा

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! CongratsCongrats

Rangnath Talwatkar's picture

आभार मुटे जी