नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

जीवाचे मैतर.....

Gujarathi sandip Vikas's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

# जीवाचे मैतर...

आसवांना देतो बाप
माझा घामाने उत्तर !
पावसाचे पाणी आहे
त्याचे सुगंधी अत्तर !

बाप दमून थकून
तरी झोपतो नंतर !
म्हणे तोंड अन पोट
किती कोसाचं अंतर !

रान सोसे ऊन वारा
जरी दूर हा अंबर !
सांजवेळी वेडावतो
गायी गुरांचा हंबर !

वेदनेशी नातं जोडे
नाही जंतर मंतर !
काळजाचे दुःख सारे
त्याच्या जीवाचे मैतर !

दुष्काळात दरसाल
बाप पहिला नंबर !
तरी आखजीला कसा
बाप पूजतो पांभर !

घरी सुखात नांदते
भूक आमची उपाशी !
हात जोडून सांगतो
घेऊ नका कुणी फाशी !

कष्ट करुन मातीत
थोडी थापावी भाकर !
एके दिवशी होईल
तुझा कुबेर चाकर !

# संदीप विकास गुजराथी,
सोमवार पेठ,चांदवड जि. नाशिक
9604502715
gujarati.svcoe@snjb.org

Share

प्रतिक्रिया