नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

परतीचा पाऊस

Rangnath Talwatkar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

परतीचा पाऊस

कोनता गुन्हा केला मी
काहून तू रूसला
येणं बावा लवकर
कुठं जावून बसला

नदी नाले धरणं बी
लई आठवण करते
बॉडी स्प्रे मारून
काहून दूर दूर पळते

का सांगू बावा तूले
प-हाटीचे हाल
काही पडल्या पिवळ्या
तर काही लालेलाल

सॊयाबीनचे त् पाहूल्या
जात नाही हाल
कॊमात गेले सारेच
जे हिरवे हॊते काल

हवा विजा घेवून
आभाळ येते दमानं
पत्ता नाही तूझा पावसा
शरीर भिजते घामानं

रोज असते पावसा मला
तूझ्या येण्याची आस
पूर निघाला असेल
रोजच होतो भास

झालं ते झालं पावसा
आता आसं नको करू
प-हाटी तूझी वाट बघते
मागं नको सरू

कोरड्या ह्या गळ्यानं
तुझे गीत कसे गाऊ
परतीच्या पावसा
आम्हा सोडून नको जावू
आम्हा सोडून नको जावू

- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि.वर्धा
७३८७४३९३१२

Share

प्रतिक्रिया