नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

शेतकऱ्याला जगवा

सिद्धेश्वर इंगोले's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

शेतकऱ्यालाही जगवा

रांगेत उभा होता दिवसभर
भरण्यासाठी अॉनलाईन अर्ज
जाहीर झाली कर्जमाफी तरीही
फिटत नाही डोक्यावरच कर्ज

झालीय तात्पुरती मलमपट्टी
जखम अजून ओलीच आहे
चीड भरली डोक्यात व्यवस्थेची
ओंजळ अजून रिकामीच आहे

मेहनत अन खर्चाच्या मानान
शेतमालाला भाव मिळतो कमी
कारखानदारीत असते तशी
शेतमालाला नाही भावाची हमी

कोणतेही सरकार आले तरी
पोशिंद्यासाठी कुणी धावत नाही
कारखानदारी वाढवती सारे
शेतकऱ्यांना कुणी पावत नाही

एवढच करा सरकार मायबाप
बाळीराचा गळफास थांबवा
कृषीप्रधान असणाऱ्या देशात
आता शेतकऱ्यालाही जगवा

--सिद्धेश्वर इंगोले.
परळी वै.जि.बीड
मो.9561204691

Share

प्रतिक्रिया