नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

इंसाफ करूयात !

Dr. Ravipal Bharshankar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

खुप झाला चिखल, ह्याला साफ करूयात ।
ह्याही पध्दतीने, इंसाफ करूयात ।।१।।

हरलो म्हणून खुदचा का, जीव घ्यायचा !
चला एकदा जीवाला, माफ करूयात ।।२।।

दुनियां अजुन कारूणिक, झाली नाही राव ।
आपण तरी आपला, मिलाफ करूयात ।।३।।

तुझा मित्र आहे रे हे, देहाचे मंदिर ।
नाही त्याच्या काही, खिलाफ करूयात ।।४।।

मला वाटतं काही तरी, बरसल्याने होईल ।
गोठलेले रक्त पून्हा, वाफ करूयात ।।५।।

Share

प्रतिक्रिया