नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

घाल घाव!

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

बळीच्या राज्यासाठी इथल्या यंत्रणेवर घाल घाव
नाहीतर आत्महत्येलाही इथे मिळणार नाही भाव

शिकाव्याच लागतील त्यांच्या निती आणि कला
अडाण्यास डिजिटल इंडियात नसेल थोडा वाव

उभारीत जा कारखाने तुझ्या कच्च्या मालासाठी
विचारणार नाही कुणी तुला का सोडले तुझे गाव

बदलायच सर्वकाही दे जुन्यास आता पूर्णविराम
सांगता येत नाही कधी पुसल्या जाईल तुझ नाव

आपल्या बचावासाठी आता छातीला लाव माती
कधी पछाडतील आपणास सांगता येत नाही राव

Share

प्रतिक्रिया