नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

पालवी एक संदर्भ

Kirandongardive's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

*पालवी : एक संदर्भ*
जेव्हा
अंगणात जमा होणार्‍या
पानगळीच्या कचर्‍यापासून
सुटका करून घेण्यासाठी
ते बोलावतात,
एखादा भाडोत्री कुर्‍हाडबाज
जो बेमुर्वतपणे
चालवतो कुर्‍हाड,
आज्याने उभ्या केलेल्या
हिरव्यागार सावलीवर..!
तेव्हा अंगणात 
नष्ट झालेली असते
बापलेकाच्या नात्यातली
ओलसर पालवी..!

किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर मेहकर ता मेहकर
जि बुलडाणा पिन 443301
मोबा ७५८८५६५५७६
email kdongardive@gmail.com

Share

प्रतिक्रिया