नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

दमानं घ्या; आत्महत्या करू नका !

Dr. Ravipal Bharshankar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

मनात येणारे विचार तसे भानगडीचे
मनात येणारं सारच काही नसते खरं..

किती लू लू करतात लोकं ह्याच्यासाठी अाणि त्याच्यासाठी
किती धू धू जळतात लोकं ह्याच्यासाठी अाणि त्याच्यासाठी
आयुष्यभर मनाने वागतात परंतु काय त्यांच्या पदरी पडते बरं
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

मी आज एक स्वप्न पाहिलं, चिंतीत झालो; उताविळ झालो
आणि जसा असतो स्वप्नाबाहेर तसाच मी त्या स्वप्नातही झालो
पण झोप उघडली आणि सर्व काही झालं, बरं
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

मनात येणारे विचारही स्वप्नांसारखेच
फरक एवढाच की झोपेत येतात म्हणुण स्वप्न
आणि दिवसाढवळ्या येतात म्हणुण विचार
आता पहा आहे की नाही गंमत बरं
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

म्हणुण शेतकरी बांधवांनो, दमानं घ्या; आत्महत्या करू नका!
खुप केल्या जनांनी चुका तुम्ही तरी करू नका
कारण कुणाला नसेल परंतु मला तुमची गरज आहे, तरी ऐका बरं
मनात येणारं सारच काही नसते खरं ..

Share

प्रतिक्रिया