नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

अरे, फुलवा अंगारमळा!

Dr. Ravipal Bharshankar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

खेळ खेळता आभाळाचा, रूप धरले मातीचे।
सावळा गडी लटकून मेला, नाव हरले शेतीचे।।१।।

सोन सकाळी रात्र झाली, त्याच्या जीवनाची।
शेतक-यांनो सावध व्हा रे, शेत चरती बाकीचे।।२।।

एका मागुन एक चालला, तरी जाग येईना।
काय म्हणावे डोके आहे, शासनाच्या जातीचे।।३।।

स्वप्नाप्रमाणे लोक विसरती, तुझ्या मरणाला।
सूर्याखाली अंधार माजला, लक्ष नसता वातीचे।।४।।

कृषि पासून ऋषि पर्यंत, हा देश समृद्ध।
दोन्हीची पण किंमंत नाही, दुर्भाग्य भारतीचे।।५।।

तुमच्या हाती नांगर आहे, फास का घेता ?
अरे, फुलवा अंगारमळा, ब्रिद हे घ्या कृतीचे।।।।६।।

Share

प्रतिक्रिया