मातीच्या लेकराची लेक

Kirandongardive's picture

मातीच्या लेकराची लेक.. 

तुझ्या हुंड्याचा प्रश्न जिवाला पडलाय पोरी 
पीक नसल्या शेतात गळ्याला लावतोय दोरी..

जगलो अन जगवलं तुम्हाला होईल तसं
मात्र केलं नाही पाप केली नाही चोरी

फाटक्या लुगड्यात घालवलं सारं आयुष्य
त्या तुझ्या मायचे आसू पुसशील ना पोरी?

सरणाच्या खर्चाचा नको घोर करू बाळा
धुर्‍यावर फोडून ठेवल्यात केंव्हाच दोन बोरी

पडीक जमीन सारी जप जमेल तशी
मातीच्या लेकराची लेक म्हणे नसो गोरी

किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर जि बुलडाणा
पिन 443301
मोबा ७५८८५६५५७६

लेखनविभाग: 
गझल
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! CongratsCongrats