नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
 
 
 

पाऊसपाणी

Kirandongardive's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

पाऊसपाणी

आभाळातून थेंब नाही डोळ्यात साचले पाणी
ऐकू दे विठ्ठला..ओल्या थेंबांची पाऊसगाणी

भेगाळलेल्या मातीमायला वांझपणाचे दूषण का रे?
जर बापपण विसरून आभाळच विसरलं पाऊसपाणी

एकरभर विकून, शहरातमास्तर झालंय पोरगं
हिस्सा मागायला खळ्यावर तरी येऊ दे राजावाणी

बैल विकून खुंट्यावरचा पैसा फेकला मातीत
अंकुर फुलून होऊ दे सगळीकडे आबादाणी

वारीतल्या भजना-अभंगातच नाचू नको देवा
आम्हीही हरिविठ्ठलच गातो पेरणी करताना रानोरानी

दुथडी भरून वाहू दे गावागावातली गंगा-चंद्रभागा
व्याकूळ भक्ता भेटण्या तूच हो पाऊसपाणी, विठ्ठलवाणी

किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर जि बुलडाणा
मोबा ७५८८५६५५७६

Share

प्रतिक्रिया