शेतकऱ्यांचे सामुहिक उपोषण

Event Description: 
३ सप्टेंबर २०१७ सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे सामुहिक उपोषण
Date: 
रवीवार, September 3, 2017
approved

प्रतिक्रिया

admin's picture

शेतकरी भावांनो आणि मायबहीनिंनो,
३ सप्टेंबर २०१७ हा दिवस म्हणजे कोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांचा ८२ वा जन्मदिवस. “देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही” असे युगात्मा शरद जोशी नेहमी म्हणायचे पण क्रूर नियतीने अवेळीच डाव साधला आणि त्यांचे स्वप्न अधुरे राहून गेले.
भरीसभर फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली निकषांची चाळणी लावून शेतकऱ्यांसोबत पोरखेळ सुरु केला आहे. "शेतकर्‍यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यायची आहे" अशा आशयाची वक्तव्ये मा. फडणवीसांनी वेळोवेळी केली आहेत पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची घोर फसवणूकच केलेली आहे.

या सरकारी कर्जमाफीच्या निषेधार्थ आणि खालील मागण्याच्या पूर्ततेसाठी ३ सप्टेंबर २०१७ रोज रविवारला सामुहिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
• शेतकऱ्यांवरील सर्व कर्जे अनैतिकच असल्याने विना अट, विना निकष सातबारा पूर्णपणे कोरा करा.
• वीज बिलातून शेतकऱ्यांची पूर्णतः मुक्तता करा.
• शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी निर्यात शुल्क वाढवणे, निर्यातीवर बंदी अथवा निर्बंध लादणे, चढ्या दराने परदेशातून होणारी आयात करणे, आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालणे, व्यापारी साठ्यांवर मर्यादा घालणे, विक्री किमतीवर मर्यादा घालणे आदी उपाय कायमस्वरूपी बंद करावेत.
• शेतीला जाचक ठरणारे कायदे रद्द करा.
• युगात्मा शरद जोशी प्रणीत मार्शल प्लान (भारत उत्थान कार्यक्रम) लागू करा.
युगात्मा शरद जोशींचे स्वप्न साकार होऊन शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी या उपोषणात शेकडोंच्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती.

स्थळ : लाल बहादूर शास्त्री पुतळ्यासमोर वेळ : सकाळी ८ ते सायं ६ पर्यंत
रेल्वे स्टेशन जवळ, वर्धा
: विनीत :
शेतकरी संघटना, वर्धा
--------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक : गंगाधर मुटे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा