हे गणराज्य की धनराज्य?

गंगाधर मुटे's picture
काव्यप्रकार: 
कविता
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

हे गणराज्य की धनराज्य?

प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!

एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!

डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!

विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही...!!

गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

एक झंझावात अण्णा

देश हा खंबीरतेने टाकतोया कात अण्णा
इंडियाला भावला हा एक झंझावात अण्णा

---------------------------------------
माझी वाङ्मयशेती - फेसबूकपेज
---------------------------------------

संपादक's picture

Vandana Kolarkar - फेसबूक

भ्रष्टाचार
Vandana Kolarkar - फेसबूक

nrupas nacha ye nyunata!! ulat dadapshahi ani brashtacharatch tyala dhanyata vatatey. sadya paristhiticha agdi yogya shabdat varnan kelayt.

गंगाधर मुटे's picture

गणतंत्र दिनाच्या सर्वांना

गणतंत्र दिनाच्या सर्वांना आगाऊ हार्दीक शुभेच्छा...!!!! 

---------------------------------------
माझी वाङ्मयशेती - फेसबूकपेज
---------------------------------------

प्रतिसाद द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तसेच कुठल्याही परिस्थीतीत सार्वजनिक केल्या जाणार नाही.
CAPTCHA
आपण मशीन नसून मानवच आहात, याची खात्री करण्यासाठी हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
9 + 10 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.