जीवन एक शेती

ravipal bharshankar's picture
काव्यप्रकार: 
कविता

एक शेती मातीची; अन्
एक शेती मतीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||धृ||

जिवन एक; तरी भीन्न ते
दोन्ही टोकां वरी
पायी भेगा दु:खाच्या; परि
शिरी सुख मंजिरी
समई खाली; तिमीर नांदतो
ज्योतिर्मयता वातीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||१||

एकिचे बळ; कुचकामाचे
माणुस नाही; ढोरं
शेळ्यांच्या कळपाला म्हणती
का गं कोणी; थोरं
बुद्धीने जगी; काळ जिंकला
हसली भीती रात्रीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||२||

माती मधुनी; मती निपजते
तरी शेतकरी अज्ञानी
घरी ज्याच्या; धरम-करम तो
कसा होई हो विज्ञानी
आम्ही हा जो; खेळ मांडला
त्याला उपमा; भक्ति ची, युक्ति ची, शक्ति ची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||३||

प्रतिक्रिया

Nilesh's picture

सुंदर

ravipal bharshankar's picture

Thanks

Ravipal Bharshankar