तु जान माणसा, सुजान माणसा

ravipal bharshankar's picture
काव्यप्रकार: 
कविता

तु जान माणसा, सुजान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||धृ||

शेतक-याची बैलगाडी
लुळी- पांगळी झाली
वादळ वारा काळ पेटला
कोणी नाही वाली
अश्रृ ढाळतो शेतकरी, दया न माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||१||

खेळ मांडुनी क्लुप्त्यांचा
करणी केली मोठी
पांढरपेश्या कावळ्यांनी
धरणी केली खोटी
अन्यायाने घोट घेतला, छान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||२||

लय वज केली मातीची
छातीला लावुनं
आयुष्याची माती झाली
शेतीला वाहूनं
शेतक-यांची सुळावरती, माण माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||३||

शेतक-यांच्या कामक-यांच्या
घामाचे खाऊनं
मातीला ही विसरूण गेले
ए सी तं राहूणं
शेतक-यांचे नाही कुणाला, भान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||४||

भूमातेच्या पदरी केली
शेती लाजवंती
ओठ आपले हाय म्हणावे
आपल्याच दंती
शेतक-यांनी काय करावे, दान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||५||

प्रतिक्रिया

Nilesh's picture

सुंदर

ravipal bharshankar's picture

Thanks

Ravipal Bharshankar

ravindradalvi's picture

वास्तववादी कवीता सुजान मानसा

रवींद्र अंबादास दळवी
नाशिक

ravipal bharshankar's picture

Thanks

Ravipal Bharshankar