नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

ग्राम पंचायत - ऍपचा उद्देश

ग्राम पंचायत - ऍपचा उद्देश

"पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रीद घेऊन कार्य करणारी "शेती अर्थ प्रबोधिनी" ही सामाजिक संस्था आहे. शेती विषयक कार्य करतानाच गावगाड्याविषयी काही रचनात्मक कार्य करण्याचे उद्देशाने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.  
 
या ऍपच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी विविध शासकीय योजना, काही महत्वाचे ग्रामपंचायतशी संबंधित GR, महत्वाच्या लिंक्स तसेच अन्य तांत्रिक व उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वेळोवेळी माहिती अद्ययावत करून त्यात भर घातली जाणार आहे. जेणेकरून ऍपचा सहजसुलभ वापर करुन गावविकासासाठी ग्राम पंचायतचे पदाधिकारी, सचिव तसेच सर्वसामान्य नागरिकांना एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
 
आशा आहे की, सर्वांना हे ऍप उपयुक्त ठरेल. आपल्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत आहे.
 
गंगाधर मुटे
अध्यक्ष
शेती अर्थ प्रबोधिनी
Share