नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गोलमेज चावडी

Wall Post
PREMRAJ LADE updates its status
November 16, 2018 at 02:09pm
माझ्या लेखाला आणि कवितेला अजून प्रतिसाद नाही . कसलीतरी चूक माझ्या लेखनात असेल ती चूक आपण वरिस्टांनी मला लक्ष्यात आणून द्यावी . ही नम्र विनंती .
गंगाधर मुटे तुम्ही सुद्धा कोणत्याच पोस्टला प्रतिसाद दिलेला नाही ना? सर्व असेच म्हणतील कि माझे लेखन इतरांनी वाचावे, मी मात्र कुणाचे वाचणार नाही तर कसे चालेल? आपले कुणी वाचो किंवा ना वाचो, मी मात्र इतरांचे लेखन वाचतो ..... तर काही तरी सकारात्मक घडेल.
November 22, 2018 at 04:44pm
Dr. Ravipal Bha... updates its status
October 2, 2018 at 06:23pm
बळीराजा डॉट कॉमवर दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धा- २०१८, चा आज शेवटचा दिवस. प्रवेशिका सादर करायला अवघ्या काही तासाचा अवधी बाकी राहिला आहे. खुप मज्जा आली स्पर्धेत भाग घेताना. जवळजवळ सबंध महीना शेतकरी चिंतनात गेला. या योगे अतिशय प्रमाणिक व संतुलित विचार साहित्यात रेखाटण्याचा प्रयत्न केला. करीता धिरज ताकसांडे, प्रदीप थूल, राजेश जौंजाळ अनेकदा एकत्र बसलो. चर्चा केल्या मैफली रंगल्या. आणि हो, रमेश बुरबुरे हे दूर जरी असले तरी तेही संपर्कात होते. मुटे सरांना खुप खुप शुभेच्छा. स्फर्धेचा निकाल लवकर जाहीर करा सर.. हा हा हा! सर्वांचे आभार!!
लक्ष्मण खेडकर updates its status
September 27, 2018 at 01:49pm
कविता समजून घेताना भाग: २७ • शेत नांगरताना ट्रॅक्टरने नांगरताना शेत बांधावरला निघालेला दगड पाहून बाप हळहळला वाटलं असेल वाटणीचा निटूबा रवता येऊल पुन्हा म्हणून मीही केलं दुर्लक्ष पण बापाचे पाणावले डोळू पाहून न राहून विचारलं, "काय झालं, आबा?" सरळ करीत दगड बाप बोलला, "कही नही रं, गणिशाला मिठात पुरीलेल्या जाग्याची व्हती खुण" अन् बाप सांगू लागला मातीआड गेलेल्या बैलाचे गुण "घर, ह्या मळा, तुही साळा ह्याचाच तर जीवावर सारं उभं राह्यालं बाळा!" -लक्ष्मण खेडकर •• माणूस निसर्गाने निर्माण केला, पण नाती माणसाने तयार केली. त्यांना नावे दिली. ती जपण्यासाठी प्रयोजने शोधली. प्रयोजनांचे प्रासंगिक सोहळेही संपन्न केले. समूहाच्या काही गरजा सार्वकालिक असतात. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे लागतात. नितळपण घेऊन वाहते राहण्यासाठी त्यांना परिमाणे द्यावी लागतात. आयुष्याच्या वाटेने मार्गस्थ होताना अनेक गोष्टी कळत-नकळत सोबत करतात. कधी त्यांना सोबत घेऊन चालणे घडते. काही गोष्टी घडतात. काही घडवता येतात. काही टाळता येतात. काहींपासून पळता येतं. काही प्रत्येक पळ सोबत करतात. संस्कृतीचे संचित स्नेहपूर्वक सांभाळावे लागते. तो प्रवास असतो आपणच आपल्याला नव्याने शोधून घेण्यासाठी. याचा अर्थ संकृतीचे किनारे धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टी अगत्याने जतन कराव्यात असेही नसते. त्यांची प्रयोजने आकळली की, त्याच्या असण्या-नसण्याचे अर्थ उलगडत जातात. प्रघातनीतीच्या परिघात सामावलेल्या सगळ्याच गोष्टी काही टाकावू नसतात अन् सगळ्याच टिकावू असतात असंही नाही. ते पाहणे असते आपणच आपल्याला. तो प्रासंगिक गरजांचा परिपाक असतो. जगण्याच्या वाटेने घडणाऱ्या प्रवासात माणसाने अनेक गोष्टी संपादित केल्या. काही घडवल्या. काही मिळवल्या. नाती त्याने अर्जित केलेली संपदा असते. त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. आयुष्याच्याचे काठ धरून वाहताना नाती एक अनुबंध निर्माण करीत राहतात. त्यांला प्रासंगिकतेची परिमाणे असतात, तशा प्राथमिकताही असतातच. याचा अर्थ मनात वसती करून असणाऱ्या सगळ्याच गोष्टी निवडता येतात असे नसते. हे चालणे असते नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने. नियतीचे अभिलेख ललाटी गोंदवून इहतली आलेला जीव जन्मासोबत काही घेऊन येतो. काही वाढता-वाढता मिळवतो. धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासोबत पिढ्यांचा वारसा घेऊन जन्मदत्त नाती वाहत असतात. त्यांना निवडीचा पर्याय नसतो. आहेत तशी आणि आहेत त्या गुणावगुणासह ती स्वीकारावी लागतात. त्यांचं वाहणं सिद्ध असतं. त्यांना साधता येत नाही. सगळीच नाती काही रक्ताच्या प्रवाहासह नसतील वाहत; पण भावनानाचे किनारे धरून मनाच्या प्रतलावरून सरकत राहतात. यांच्या वाहण्याला रक्ताचे रंग देता येणे संभव नसले, तरी आस्थेचे अनुबंध घेऊन बांधता येणं शक्य असतं. त्यांना पर्याय असतात. भावनांच्या हिंदोळ्यावर विहार करणाऱ्या अशा नात्यांना आनंदाची अभिधाने असतात. त्यांच्याशी जुळलेल्या संदर्भांचं स्पष्टीकरण देता येतंच असं नसतं. अंतर्यामी विलसणारा नितळ स्नेह घेऊन ते आयुष्याला आकार देत असतात. जगण्याला लाभलेला नात्यांचा स्पर्श माणसांना नवा नाही. त्यांना निर्देशित करता येतं. असणं अधोरेखित करता येतं. म्हणूनच सत्तेची वस्त्रे अंतरावर ठेऊन सुदाम्यासाठी पुढे येणारा कृष्ण मैत्रीचं आभाळ होतं. अनुबंधाच्या धाग्यांनी विणलेल्या नात्यांना आयाम देणारं परिमाण ठरतं. स्नेह सेतू बांधून घडणारा हा प्रवास सौहार्दाचं सुखपर्यवसायी प्रत्यंतर असतं. नाती मोडता येतात, घडवता येतात. तोडण्यासाठी फार सायास करायची आवश्यकता नसली, तरी जतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयास करावे लागतात. स्नेहाच्या धाग्यांनी बद्ध होण्यात सौख्याची सूत्रे असतीलही. पण ती केवळ माणसांशी अनुबंधित असतात असे नाही. आपल्या आसपास असणाऱ्या अनेक गोष्टी आस्थेचे अनुबंध आकारास आणण्याचे कारण असू शकतात. कधी निसर्ग स्नेही होतो. कधी झाडे-वेली प्रेमाचा स्पर्श घेऊन बहरतात. कधी आपल्या मूठभर विश्वात कुठलातरी प्राणी आपलं चिमूटभर जग उभं करतो. म्हणूनच की काय संत ज्ञानेश्वरांनी ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हटले असेल. हे मैत्र जगण्याला अधिक गहिरं करीत असतं. शेतीमातीत जन्म मळलेले आहेत, त्यांना मातीशी असणाऱ्या अनुबंधाच्या परिभाषा नाही शिकवाव्या लागत. त्याच्यासोबत जगणारे जीवही जिवलग होतात. कदाचित माणसांच्या मैत्रीपेक्षा हे नातं अधिक गहिरं असू शकतं. आस्थेचा ओलावा घेऊन ते जगण्यात सामावतं. शेतीमातीत रमणाऱ्याला वावरातील गवताच्या काडीशीसुद्धा सख्य साधता येतं. त्याच्याशी केवळ बहरलेलं शिवार, आकाशाशी गुज करणारी शेते अन् वाऱ्यासोबत डुलणारी पिके मैत्रीच्या धाग्यांनी बांधलेली नसतात. मूक सोबत करीत त्याच्या जगण्याला जाग देणारं एक जग गोठ्यात वसतीला असणाऱ्या गुरावासरांच्या संगतीने नांदत असतं. त्याच्यासाठी ते केवळ पशू नसतात. स्नेहाचा धागा त्यांना बांधून असतो. या नात्याला प्रगतीच्या परिभाषेत नाही कोंबता येत. अंतरीचा ओलावा घेऊन वाहत असते ते. यंत्रांचे पाय लावून धावणाऱ्या जगात या प्राण्यांचे मोल फारसे राहिले नसेल. कदाचित संकुचित होत जाणाऱ्या जगण्याच्या वर्तुळात त्यांना सामावण्याएवढं व्यापकपण उरलं नसेल. प्रगतीच्या वार्ता करणाऱ्या जगाला वेगाचा स्पर्श अधिक सुखावह वाटत असेल. पण प्रगतीच्या पावलांनी चालत येणारे सगळेच बदल काही यशाची प्रमाण परिमाणे नसतात. पावलांना प्रेमाचा स्पर्श घडला की, सौख्याचे मळे बहरतात. पण समाधानाच्या व्याख्याच बदलल्या असतील तर... प्रगतीची चाके पायी बांधून धावणाऱ्या जगण्याला जसा वेग आला, तशी माणसे स्वतःपासून सुटत गेली. स्नेहाचे संदर्भ घेऊन वाहणारे झरे आटू लागले. जेथे स्वतःलाच जागा नाही, ते इतरांना आपल्यात कसे सामावून घेतील? एक काळ होता सामावणे सहज घडत जायचे. शेतकरी म्हटला की, त्याचा जगण्याचा पसारा अनेक गोष्टींना आपल्यात घेऊन नांदायचा. कदाचित ही अडगळ वाटेल कोणाला. पण या अडगळीलाही आपलेपणाचे अनेक अनुबंध असायचे. या बंधांचा परीघ केवळ घर-परिवार एवढाच सीमित नव्हता. परिवार शब्दाची परिभाषा परिमित कधीच नव्हती. अपरिमित शब्दाचा अर्थ त्या असण्यात सामावलेला असायचा. खरंतर शेती केवळ पिकांनी बहरलेले मळे घेऊन, आनंदाचे सोहळे साजरे करीत निसर्गाच्या सानिध्यात रमणे नसते. त्याचं नातं सहवासात सामावलेल्या सगळ्याच गोष्टींची सोबत करणारं. त्याच्यासाठी गायी-वासरांच्या हंबरण्याने जाग येणारा गोठा एक नांदतं विश्व असतं. जिवाचा विसावा असतो तो. घरातल्या माणसांइतकाच जित्राबांनाही जीव लावण्यात कोणाला नवल वाटत नाही. हे प्राणी वाचा घेऊन आले असते, तर कदाचित आपल्या मालकाशी गुज करीत रमले असते. त्याच्या सुख-दुःखात हसले-रडले असते. अर्थात, स्नेह व्यक्त करण्यासाठी शब्दांची सोबत असायलाच लागते असेही नसते. अंगावरून ममतेने फिरणारा हातही बरंच काही सांगून जातो. मालकाच्या पावलांच्या आवाजाने कान टवकारून बघणारे मुके जीव त्याच्या स्पर्शाने पुलकित होतात. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने थरथरणारी त्यांची पाठ कृतज्ञतेचा प्रतिसाद असतो. प्राण्यांशी असणाऱ्या अनुबंधाना अधोरेखित करणारी ही कविता अशाच एक कृतज्ञ नात्याचे गोफ विणत मनात वसतीला उतरते. हे नातं माणसाचं माणसाशी नसलं म्हणून काही त्याच्या अर्थाचे आयाम नाही बदलवता येत. किंबहुना स्व सुरक्षित राखणाऱ्या स्वार्थी नात्यांपेक्षा, हे निर्व्याज नातं अधिक गहिरेपण घेऊन येतं. घराचं प्राक्तन पालटण्यासाठी जगणं विसर्जित केलं त्या मुक्या जिवाप्रती कृतज्ञता घेऊन येतं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात वसतीला उतरलेलं हे जग जगल्याशिवाय कसे समजेल? हा प्रवास आहे अनुभूतीचा, नुसती सहानुभूती घेऊन कसा आकळेल? जावे त्याच्या वंशा शब्दाचा अर्थ आपलेपण घेऊन वाहणाऱ्या आस्थेच्या ओलाव्याजवळ येऊन थांबतो. कुण्या शेतकऱ्याला विचारा, त्याच्यासोबत हाडाची काडे करणाऱ्या बैलांचे त्याच्या जगण्यात स्थान नेमके काय आहे? लेकरांइतकेच त्याला ते मोलाचे वाटते. त्याच्या मनाच्या मातीतून उगवणाऱ्या हिरव्या स्वप्नांचे उत्तर या मुक्या जिवांच्या श्रमणाऱ्या जगण्यात सामावलेलं असतं. बापासाठी बैल गोठ्यात वसतीला असलेला केवळ एक प्राणी नसतो. जगण्यात उमेद पेरणारा हा जीव ऊनवारापावसाची तमा न बाळगता सोबत करीत झटत राहतो. त्याच्या धडपडीची प्रेरणा असतो. काळ बदलला काळाची समीकरणे बदलली. समाधानाचे अर्थ नव्याने अधोरेखित झाले. सुखांची गणिते सहज साध्य करणारी सूत्रे शोधली गेली. तसे जगण्यात कोरडेपण येत गेले. यंत्रांनी संवेदनांचे झरे आटवले. आयुष्याच्या वाटेवरचा वसंत अवकाळी परतीच्या प्रवासाला लागला. जगणं शुष्कपण घेऊन उभं राहिलं आहे. भावनांचं आपलेपण घेऊन झरत राहणं संपलं. व्यवहाराचे हेतू स्वार्थाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील, तर पलीकडच्या वर्तुळांचं विश्व आकळेलच कसं? ही कविता माणसांचे माणसांपासून उखडत जाणं, उसवत जाणं अधोरेखित करते. मनाच्या मातीत पडलेल्या संवेदनांच्या निष्प्राण बिजांना धक्के देत राहते. माणसे माणसांना झपाट्याने विसरण्याच्या काळात भावनांना साद घालून माणूसपण शोधत राहते. शेत नांगरताना बांधावर रोवलेला दगड ट्रॅक्टरच्या नांगराचा फाळ लागून उखडला जातो. कदाचित शेताच्या वाटणीचा असेल आणि निघाला तर त्यात काळजी का करावी, पुन्हा नव्याने रोवता येईल म्हणून दुर्लक्ष होते. पण तो दगड पाहून बापाचे डोळे पाणावतात. कवी न राहून काय झालं म्हणून विचारतो. उखडलेला दगड सरळ करीत वडील म्हणाले, काही नाही, गणेशला मिठात पुरलेल्या जागेची खूण होती. हे सांगताना त्याच्या मनात कालवाकालव होते. काळाच्या पटलाआड दडलेल्या एकेक स्मृती जाग्या होऊ लागतात. विस्मृतीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात विसावलेल्या एकेक आठवणी चालत येतात. जगण्याचं वर्तमान ज्याच्या उपकाराने भरलेलं आहे, त्याच्या आठवणीत बाप गहिवरतो. वर्तमानाच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने रुजवणाऱ्या गणेशच्या आठवणींनी मनाचं आभाळ भरून येतं. मातीआड गेलेल्या बैलाचे एकेक गुण बाप सांगू लागतो. खरंतर या मुक्या जिवाच्या जिवावर त्याचं घर सावरलं. राबणारे हात घरला घरपण देत होते. हातांच्या रेषांत नियतीने रेखांकित केलेलं प्राक्तन पालटण्यासाठी पायाचे तळवे झिजवणारा गणेश घरासाठी नुसता बैल कुठे होता? त्याच्या राबत्या पावलांच्या खुणांनी मळा बहरला. घरी येणारी लक्ष्मी गणेशाच्या कष्टाचं फलित होतं. पोटाला भाकरी अन् डोळ्यांना स्वप्ने देणाऱ्या गणेशाच्या उपकारांमुळे लेकराला शाळेची वाट सापडते. गणेश नसता तर आज उभा राहिला आहे, तेथे त्याला पोहचता आले असते का? रक्ताची नाती दुरावतात. सौख्याची सूत्रे बदलतात. समाधानच्या व्याख्या दिशा बदलतात. स्वार्थाने ओतप्रोत भरलेल्या जगाचे सगळे मालक. पण मतलबाच्या जगापासून कोसो दूर असणाऱ्या गणेशाच्या जिवावर सारंकाही उभं राहिलं. आयुष्याचं रामायण घडलं, पण जगण्यात राम आला. असे कोणत्या जन्माचे ऋण घेऊन गणेश घरात आला असेल? हे बापाला सांगता येत नसलं, तरी घरासाठी राबराब राबून गेलेला हा जीव आपल्या जीवात जीव टाकून गेला, हे त्याला विसरता नाही येत. नात्यांची वीण घट्ट असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचारांनी नात्यांना नवे आयाम दिले आहेत. काळाने माणसांना अडनीड वळणावर आणून उभे केले आहे. नात्यांचे पीळ सुटत आहेत. नवनव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज स्नेहाची सूत्रे हरवत आहेत. नाती जपण्यासाठी धडपड चालली आहे. ती तुटली म्हणून माणसे कासावीस होताना दिसत आहेत. आपापसातला संघर्ष दुरावा निर्माण करतोय. प्रसंगी चार पावले मागे येत नाती सांभाळीत माणसे टिकवून ठेवण्याचा काळ खूपच मागे राहिला आहे. माणसं भौतिक सुखांवर स्वार होऊन खूप पुढे निघून आली आहेत. माणसाला माणसेच सांभाळता नाही येत, तेथे मुक्या जिवांचा विचार करतोच कोण? नाही का? •• चंद्रकांत चव्हाण संवाद: ९४२०७८९४५५
rameshwar updates its status
September 23, 2018 at 03:34pm
शेतकऱ्यांच्या चळवळी आज प्रत्येक गल्लीबोळामध्ये उभ्या राहत आहेत ह्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना स्थापन करण्यामागे कारण काय तर याचे कारण महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध हिंदुस्थान भरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा त्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या समस्या वरती उपाय सुचवणारा एकही विचारवंत भारतात आजघडीला नाही. ही आजची परिस्थिती. 1980 साली शरद जोशींनी शेतकरी संघटना स्थापन केली त्यावेळी अशा वेगवेगळ्या शेतकरी संघटना गल्लीबोळामध्ये उभ्या राहत नव्हत्या कारण शरद जोशी होते शरद जोशी हे प्रत्यक्ष शेती करून शेतीचा अभ्यास केला शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला त्यांनी हात घातला शेतक-यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती म्हणून केवळ फक्त शरद जोशी या एका व्यक्तीभोवती संपूर्ण भारतातील शेतकरी गोळा झाले. आज हे होताना दिसत नाही. शरद जोशी गेल्यानंतर दुसरा वैचारिक मांडणी करणारा नेता आपल्या समोर नाही हे एकमेव कारण नवनवीन संघटना स्थापन होण्यामध्ये आहे. शरद जोशी यांच्या शेतकरी प्रश्नाच्या आकलनात त्यांनी स्विझर्लंड मध्ये नोकरीच्या निमित्ताने तिथल्या समाजजीवनाच्या घेतलेल्या अनुभवासह महत्त्वाचे स्थान आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर भारतामध्ये शेतकर्‍यांची संघटना झाली ही फक्त शरद जोशी यांच्यामुळे आपण ज्योतिबा पासून ते आजपर्यंत जर का बदलत्या परिस्थितीचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे आकलन हे व्यापक झाले ते केवळ शरद जोशी यांच्या मुळे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर त्याचे परिणाम प्राप्त झाले. जातीव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था यांना ओलांडून शरद जोशी शेतीच्या व्यापक अर्थव्यवस्थेची सांगड घालून इच्छित होते ऐंशीच्या दशकामध्ये शेतकरी चळवळ ही खूप प्रभावशाली होती पण शेतकरी चळवळीत फूट पाडण्याचे काम आजवर प्रत्येक राजकीय पक्षाने केलेले आहे शेतकरी चळवळ आणि इतर राजकीय पक्ष तसा जवळचा संबंध कधीही नव्हता तरी या चळवळीत फूट पाडण्यात प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजवर कारणीभूत ठरलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आजवरचा इतिहास हे सांगतो केवळ एका राजकीय पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. चळवळीचे नेतृत्वाला लागलेली राजकीय हव्यासही यानिमित्ताने समोर येत आहे चळवळीच्या नेतृत्वाला राजकीय खुर्चीचे डोळे लागल्यावर दुसरे काय होणार चळवळीचा हर्ष उदाहरणार्थ राजू शेट्टी सदाभाऊ खोत शंकर धोंडगे अनिल गोटे लक्ष्मण वडले अशी कित्येक नाव घेता येतील की ज्यांना राजकीय खुर्चीचा हव्यासापोटी ते बाहेर गेले ऐंशीच्या दशकामध्ये शेतकरी चळवळ उभारणे ही काही सोपे काम नव्हते दिवंगत शरद जोशी यांनी सारे आयुष्य या चळवळीसाठी व्यतीत केले संघटना त्या काळामध्ये राज्य वरच नव्हे तर देशभर वेगवेगळ्या सभा घेतल्या श्री जोशी यांना खूप पायपीट करावी लागली. शरद जोशी शेतकरी संघटना हा जागतिक कौतुकाचा विषय ठरला करण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या युनोसारख्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातला एक अधिकारी मोठ्या पदावरती काम करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा सांधा बदलून या परत देशात परत येतो शेतकऱ्यांचे संघटन बांधतो बघता बघता मोठी लढाई उभी करतो हे सगळे त्याकाळी अविश्वासनीय वाटत होते, शेतकरी संघटना हा शरद जोशी यांचा श्वास होता युनो मध्येमोठ्या पगारावर काम करत असताना ती नोकरी सोडल्यानंतर त्यांनी स्वतःला आमूलाग्र बदल करून घेतले आणि शेतकरी जीवनाची ते एवढे एकरूप झाले की तिथपर्यंत शेतीची प्रत्यक्ष संबंध नसलेला हा माणूस शेतकऱ्याला आपल्या नांगरा एवढा जवळचा वाटू लागला शेतकऱ्यांच्या कष्टाचे अर्थशास्त्रीय शरद जोशी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला भाव ठरवताना जोशी यांनी मांडलेल्या कष्टाच्या अर्थशास्त्राची सुद्धा दखल घ्यावी लागली हेच त्यांचे सर्वात मोठा यश आहे. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचा व्यक्तिगत जीवनासाठी कधीही वापर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच शरद जोशी यांनी जिवंत असताना संपूर्ण ताकीदीचा वापर केला नाही. स्वतःसाठी संघटन त्यांनी काही मिळवले किंवा संघटनेचा नावावर काही केलं असा एकही प्रकार कधी घडला नाही शेतकऱ्या बद्दलचे त्यांचे महत्त्व हे मनापासूनचे होते दिखाव्यासाठी ते पुढारी नव्हते आणि दिखाव्यासाठी ते कधीही प्रचारक नव्हते पत्रकार जवळ करून त्यांच्या संघटनेची माहिती अधिकाधिक कशी प्रसिद्ध करता येईल याचा त्यांनी विचार केला नाही. आणि संघटनेच्या विरुद्ध कोण आहे त्याचाही भाऊ कधी त्यांनी केला नाही आपले काम प्रभावीपणे करीत राहणे हीच भूमिका त्यांनी सातत्याने बजावली आज ना उद्या आपण जगाचा निरोप घेणार हे जाणवल्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय विचारपूर्वक आपले स्वतःचे मृत्युपत्र तयार केलेले एक संस्कार मानला जातो त्यामुळे या जगाचा निरोप घेताना सिकंदर रिकाम्या हाताने जावे लागले. भारतामध्ये शेतीची समस्या सर्वप्रथम शरद जोशी यांनी देशाच्या विषयपत्रिकेवर ती आणली शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढती महागाई शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाला पोसताना आलेली हतबलता यामुळे महाराष्ट्रासह देशात गेली पंचवीस-तीस वर्षे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतरही केंद्र सरकारला जाग आलेली नव्हती कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या समस्या केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या वेशीला टांगली गेली. भारताची बदनामी झाली भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच असल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली तोट्यातील शेती परवडेना झाली निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या बहुतांश शेती व्यवसायाला अवकळा आली जोशी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून वाजवी भाव मिळावा यासाठी उग्र प्रकारचे आंदोलने केली लाखो शेतकऱ्यांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी तुरुंगवास सोसला शेकडो शेतकऱ्यांचे पोलिसांच्या गोळीबारात बळी गेले अन्नदाता शेतकरी कंगाल झाला भिकेला लागला तरीही केंद्र आणि राज्य सरकारने त्यांची आर्थिक समस्या काही सोडली नाही. परिणामी वर्षभर शेतात राबून भर मेहनत करूनही त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढत गेला सहकारी शेती संस्था बँका खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. आपल्या घरादारावर आणि प्राणापेक्षा प्रिय असलेल्या शेतीच्या तुकड्यावर जप्ती येणार आपली अब्रू जाणार या भीतीने शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केल्यावरही मूळ समस्यांची सोडवणूक अद्यापही झालेली नाही आणि शरद जोशी यांना हे सरकारची मदत नको फक्त शेतकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करावे ही मूलभूत त्यांची मागणी होती त्यातही शेतकऱ्यांच्या मदत निधीतही घोटाळे झाले कापसाला वाजवी भाव मिळाला नाही अद्यापही भात गहू ज्वारी कडधान्ये उसाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितापेक्षा दलाल मध्यस्थ आणि बड्या व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण होते. काही बाजार समित्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव मुद्दामहुन पाडून लुट केली जाते. व्यापाऱ्यांनी सरकारच्या लोकांच्या हातून अत्यंत पद्धतशीरपणे शेतकऱ्यांची कोंडी करायची संधी सोडली नाही. बाजार समितीत जास्त प्रमाणात फळे भाजीपाल्याची आवक जास्त झाल्यास व्यापारी एकजूट करून भाव पाडतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राष्ट्रीय कलंक असला तरीही केंद्र आणि राज्य सरकारांना आपण शेतकऱ्यांची मुले आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या मंत्र्यांनाही त्याची शरम वाटत नाही सरकारच्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कमी झाल्याचा सरकारचा दावा वास्तव वादी नाही देशात तसेच तर महाराष्ट्रात दर महिन्याला ६०/७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये तीन ते चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते आत्महत्याची ही संख्या याचा अर्थ महाराष्ट्रात दर वर्षाला देशाच्या तुलनेत सर्वात जास्त आत्महत्या होतात आत्महत्या होण्यामागचे कारण खाजगी सावकारापासून घेतलेली कर्ज ते फेडु शकत नसल्यामुळे समाजात बदनामी होते सावकार जमिनी हडप करतो की काय अशी भीती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आजही शेतकरी असणे समाजजीवनामध्ये फारसे सन्मान जनक मानले जात नाही आम्ही शेतकरी आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकत नाही आपल्या मुलाबाळांच्या मूलभूत गरजा पुरवण्यात कमी पडत आहे अशी भावना शेतकरी कुटुंबातील महिलांना सुद्धा वाटू लागले आहे त्यामुळे ग्रामीण भागात कारखान्यात अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या तरुण नवरा म्हणून मुली पसंत करतात पण तो शेतीत भरपूर उत्पादन करणाऱ्या शेतकरी तरुणाशी लग्न करायला नकार देतात कारण शेतकऱ्याच्या हाती उत्पादन येते पण त्याचे परिवर्तन भरपूर पैसात होईलच याची शाश्वती नसते त्यामुळे शेतात राबणाऱ्या पुरुषाबरोबर महिलावर्गाची संख्या ही कमी होऊ लागली आहे कमी होऊन मजुरीचा खर्चही वाढला आहे लहान लहान झालेली जमिनीचे तुकडे त्यातून निघणारे अल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागू शकत नाही एकंदरीत ह्या सर्व समस्या वरती शेती क्षेत्रावर बदल करायचं झाल्यास शरद जोशी यांच्या विचाराशिवाय हे होऊ शकत नाही. शेतीमध्ये एक मोठी क्रांती आल्याशिवाय हे शक्य नाही बाजारपेठेचा आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ही शरद जोशी यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे पण आजही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत.
Raosaheb Jadhav updates its status
July 31, 2018 at 07:01pm
(बालकविता) बुद्धी दे... आमच्या हिरव्या मळ्यात बाप्पा, हळूहळू ये आसनावर या आराशीतल्या, विसावा तू घे ...धृ... गाडीबीडी नको आणू चिखलात जाईल फसून शेवटी तुला उंदरावरच यावे लागेल बसून... वाट इथली बारीकशी चालायाचे हाल उंदरालाही सांग बाप्पा सांभाळून चाल... वाटेत कुठे थांबू नको वेळेआधी ये...१... डोंगर केले मोठेमोठे झाडे लावली छान निघते अन डोंगरावरून नदी एक लहान... माळा केल्या फुलांच्या बा, बल्ब लावले चार रस्तेबिस्ते करताकरता दमून गेलो फार... उजेडाला वीज मात्र सोबत घेऊन ये...२... मनातलं गुपित एक सांगायचंय तुला लहान आम्हा मुलांची पाहून घे कला... टॉवर केले मोबाईलचे डोंगरावरती दोन मोठ्या तुझ्या कानांना केवढा लागेल फोन!... अभ्यासाचे नको पुस्तक सुट्टी काढून ये...३... लाडू देऊ, मोदक देऊ आणि देऊ दुर्वा मात्र ठेव मळा आमचा हसरा आणि हिरवा... नाचू, गाऊ, आरती करू खेळ सुद्धा खेळू एक होऊ, एक राहू शिस्त सारे पाळू... धांगडधिंगा घालणाऱ्यांना मात्र जरा बुद्धी दे...४... *रावसाहेब जाधव* महालक्ष्मी नगर, चांदवड, जि. नाशिक 423101 9422321596
rajesh veer shared a new video
December 7, 2017 at 05:09pm
About farmers condition in India. must watch very informative speech by Prof. Shyam Manav
admin added a new picture
November 10, 2017 at 10:20am
युगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10 नोव्हेंबर 2010 रोजी 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस शेगाव जि.बुलडाणा येथे संपन्न झाला होता. याच दिवशी साहेबांच्या हस्ते माझ्या ‘रानमेवा’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे विमोचन झाले होते. अधिक माहिती >>> http://www.baliraja.com/node/184