नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

प्राण वेचताना

Dhirajkumar Taksande's picture

असुनी किसान नाही हातात एक दाणा
इतुका कसा कृषीचा झाला खराब खाना

केली लुटून ज्यांनी उध्वस्त कास्तकारी
त्या चोर भामट्यांना आता धरून हाणा

येथून फक्त आता आवाज हा उठावा
'देता अम्हा नफा की होता तुम्ही रवाना'

केले न जर कृषीचे धोरण सरळ विधीने
फिरवून गोफ उडवा गगनात या खकाणा

सरकारचे नियंत्रण जर जीव घेत आहे
नक्कीच 'धीर' सोडा मग प्राण वेचताना

वृत्त: आनंदकन,
(गागाल गालगागा, गागाल गालगागा)

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया