नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गझल

Dr. Ravipal Bharshankar's picture

(मतला)
जो असावा दृढ विनिश्यच तोच नाही आजही.
जोश असुनी काय करता होश नाही आजही.

(हुस्नेमतला)
खिळखिळी ही राहुटी बिनधोक नाही आजही.
जाग सोडा माणवाला झोप नाही आजही.

(१ रा शेर)
कालही होत्याच भिंती आसमानी टेकल्या,
पण उथळ जे पायवे ते खोल नाही आजही.

(२ रा शेर)
पददलित लोकांत आपण मुख्यधारा आणली,
भीमबा तुमच्या लढ्याला तोड नाही आजही.

(३ रा शेर)
फार मोठी गोष्ट ही की सान मोठे शेत्करी,
भेद असुनी एक आहे दोन नाही आजही.

(अंतिम शेर)
कायद्याने शेत्कऱ्यांचे हात आहे बांधले,
अन्यथा हा शेत्करी लाचार नाही आजही.

(मक़ता)
हा असाही पावसाळा पाहतो 'रविपाल' मी,
दाटले आभाळ काळेभोर नाही आजही.

°°°

वृत्त: देवप्रिया/कालगंगा

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया