नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गझल: राजसत्ता

Rajesh Jaunjal's picture

जिवनात या भुईच्या भलताच आट आहे
नशिबी तिच्या पिलांच्या समशानघाट आहे

या ओकट्या ठगांना माहीत ना तरीका
माजून आज त्यांचा फेट्यात थाट आहे

राबून या जिवांचे वाकून देह गेले
अन दारी या कुणाच्या ही भरभराट आहे

हातात घेत झेंडे रंगीत अन बिरंगी
आली अता कुणाची तोऱ्यात लाट आहे?

फासावरी उपाशी मरण्यास सज्ज व्हावे
आकाश चांदण्यांची निजण्यास खाट आहे

खेळात या अजूनी आले शहाण नाही
झिंगाट राजसत्ता आऊट नाट आहे

राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया