नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

खेळत नाहीत मुले

Kirandongardive's picture

बाहुलीच्या लग्नात आजकाल खेळत नाहीत मुले           खेळण्यातली बंदूक घेऊन हसत नाहीत मुले |    
न जाने कोठे हरवली निष्पाप नजर ओळखीची,    
गोष्टी परीच्या ऐकून आताशा झोपत नाहीत मुले ||  

न फुलपाखरांशी ओळख न कळ्यांशी नाते कुठले,
बाग बगीच्यात फुलासमान फुलत नाहीत मुले ||  
माखतच नाहीत मातीने कधी त्याची इवले पाय,
पण चमकणाऱ्या ताऱ्यांनाही मोजत नाहीत मुले ||     कसे कोरडेच दिसतात आतून बाहेरून सारे,
चिंब पावसात कधी मनसोक्त भिजत नाहीत मुले ||
पहा कसा दुष्काळ घेऊन फिरतात ह्या आसवांचा,
आजी आजोबा मेल्यावरही रडत नाहीत मुले ||        
कोठून अनोळखी सावल्या येऊन हसतात येथे,
हृदयाचे तुकडे असूनही हृदयास जपत नाहीत मुले ||            
किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर,                    वॉर्ड न 7, मेहकर, ता मेहकर                              
जि बुलडाणा पिन 443301 ,                               मोबा 7588565576

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया