नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गझल

Dr. Ravipal Bharshankar's picture

(मतला)
हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने.
मेला कृषक उपाशी सरकार धोरणाने.

(१ ला शेर)
देहात आज उरली निव्वळ स्मशान शांती,
केला रिवाज अंतिम संस्कार धोरणाने.

(२ रा शेर)
जोडून दे म्हणावे एकेक वीट आता,
गेले तुटून माझे घरदार धोरणाने.

(३ रा शेर)
झाले गहान आता ठेवून शेत सुद्धा,
आहे अजून काही दरकार धोरणाने?

(४ रा शेर)
अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना,
केला असा अनोखा सत्कार धोरणाने.

(५ था शेर)
आता कळून चुकले असतो कसा कृषक तो,
साक्षात बनवले कृश बीमार धोरणाने.

(६ वा शेर)
आजार लाइलाजी आहेत धोरणे ही,
होणार काय तो या उपचार धोरणाने.

(शेवटचा शेर)
कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले,
आता न आनखी कर उपकार धोरणाने.

(मक़ता)
'रविपाल' कर अता या धिक्कार धोरणांचा,
तोंडात हेच येती उद्गार धोरणाने!

°°°
वृत्त: आनंदकन,
तरन्नुम: राग 'अहीर भैरव' आधारित.

शब्दार्थ:
१) क्षेम= मंगल
२) दरकार= अपेक्षित
३) कृश= अस्थिप्राय व्यक्ति
४) बीमार (हिंदी)= आजारी
५) वीट= BRICK
६) लाइलाजी (हिंदी)= असाध्य (रोग)

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया

 • Dhirajkumar Taksande's picture
  Dhirajkumar Taksande
  गुरू, 20/09/2018 - 11:45. वाजता प्रकाशित केले.

  वा क्या बात है अप्रतिम गझल डॉ साहेब
  दबलेली भडास, प्रकटली धोरणाने.


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  गुरू, 20/09/2018 - 14:41. वाजता प्रकाशित केले.

  मलाही वाटतं, अत्यंत सुंदर गज़ल झाली विषयानुरूप. यानिमित्ताने शेतकऱ्यांचे वास्तव रेखाटण्याची संधी मिळेतय आपल्याला, हे अतिशय महत्वाचे. करिता मुटे सरांचे देखील खूप खूप आभार मानावेशे वाटतात.

  Dr. Ravipal Bharshankar


 • प्रदीप थूल's picture
  प्रदीप थूल
  गुरू, 20/09/2018 - 19:48. वाजता प्रकाशित केले.

  जबरदस्त गझल.

  Pradip


 • Dr. Ravipal Bharshankar's picture
  Dr. Ravipal Bha...
  बुध, 07/11/2018 - 17:00. वाजता प्रकाशित केले.

  मनापासून खु खुप आभार आपले!

  Dr. Ravipal Bharshankar