नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कवडीमोल दाम

मुक्तविहारी's picture

कवडीमोल दाम

रक्त अाटविले आणि जिरविला घाम
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम || धृ. ||

कष्ट केले खूप शेतात दिनराती
झुकविले आभाळ आणि पिकविले मोती
आमुच्या या कष्टाची नाही त्यांना जाण
मातीतल्या राबण्याला काय हो इनाम ? || १ ||

बाजार घराचा मांडला गुरेढोरे विकून
सत्ता या हावरटांची टाकावी उलथून
महागाईशी लढताना जातो आमचा प्राण
लुटारू सत्ताधारी करी काय काम ? || २ ||

कितीही करूद्या त्यांनी काळे काम
त्याचाही त्यांना असतो अभिमान
असे लोक आता बसवावेत घरी
पुन्हा कशाला त्यांना द्यावे मतदान || ३ ||

- मुक्तविहारी,
क्वार्टर क्र. जुने डी - ८ ,
थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
ईमेल : muktvihari@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गीतरचना
Share

प्रतिक्रिया