नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मेला कृषक उपाशी

Dr. Ravipal Bharshankar's picture

(मतला)
हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने.
मेला कृषक उपाशी सरकार धोरणाने.

(१ ला शेर)
देहात आज उरली निव्वळ स्मशान शांती,
केला रिवाज अंतिम संस्कार धोरणाने.

(२ रा शेर)
जोडून दे म्हणावे एकेक वीट आता,
गेले तुटून माझे घरदार धोरणाने.

(३ रा शेर)
झाले गहान आता ठेवून शेत सुद्धा,
आहे अजून काही दरकार धोरणाने?

(४ रा शेर)
अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना,
केला असा अनोखा सत्कार धोरणाने.

(५ था शेर)
आता कळून चुकले असतो कसा कृषक तो,
साक्षात बनवले कृश बीमार धोरणाने.

(६ वा शेर)
आजार लाइलाजी आहेत धोरणे ही,
होणार काय तो या उपचार धोरणाने.

(शेवटचा शेर)
कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले,
आता न आनखी कर उपकार धोरणाने.

(मक़ता)
'रविपाल' कर अता या धिक्कार धोरणांचा,
तोंडात हेच येती उद्गार धोरणाने!

°°°
वृत्त: आनंदकन,
तरन्नुम: राग 'अहीर भैरव' आधारित.

शब्दार्थ:
१) क्षेम= मंगल
२) दरकार= अपेक्षित
३) कृश= अस्थिप्राय व्यक्ति
४) बीमार (हिंदी)= आजारी
५) वीट= BRICK
६) लाइलाजी (हिंदी)= असाध्य (रोग)

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया