नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गर्भार कास्तकारी

Ramesh Burbure's picture

"गझल"

शीर्षक :- गर्भार कास्तकारी

मातीत घालते जर, सरकार कास्तकारी..!
तक्रार मग कुणाला, करणार कास्तकारी..?

संत्ताध श्वापदांच्या, पाहून धोरणाला,
ही आज ना उद्याला, मरणार कास्तकारी..!

प्रत्यक्ष कर्जमाफी, देतो म्हणून नुसता,
करतोय भाषणांनी, गर्भार कास्तकारी...!

आश्वासनांस खोट्या, आता विराम द्यावा,
थापांमुळे खरे ही, बुडणार कास्तकारी..!

मालास भाव नाही, बेभाव बी बियाणे,
सांगा किती अजुनी, छळणार कास्तकारी..?

शासकिय धोरणांचा, करुनी निषेध यंदा,
उचलेल त्याविरोधी, हत्त्यार कास्तकारी..!

_रमेश अरुण बुरबुरे
मु. निंबर्डा, पो.शिरोली
ता.घाटंजी, जी.यवतमाळ
पिन कोड क्र.४४५३०१
मोबाईल क्र.९७६७७०५१७०
ईमेल आयडी : burbureramesh@gmail.com

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया