नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

गझल

Dr. Ravipal Bharshankar's picture

(मतला)
फळली मला कधीही नाही कृषी मुळावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.

(हुस्नेमतला)
कर्जास या अता मी फेडायचे कशावर.
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.

(१ रा शेर)
जीएम बी बियाणे पेरायला मनाई,
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.

(अंतिम शेर)
जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या,
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.

(मक़ता)
'रविपाल' कर अता तू सरकारची अवज्ञा,
धोरण अरे तयाचे उठले तुझ्या जिवावर.

°°°

बहरे मज़ार (फारसी) ची मुज़ाहिफ़ सूरत,
किंवा वृत्त आनंदकन (गणभंग{अरकान} न करता) 'गागालगा लगागा' ×२.
तरन्नुम: अहीर भैरव राग आधारित.

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया