नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अभंग

ravindradalvi's picture
काव्यप्रकार: 
अभंग

अभंग

कोनाचीच नाही I चालतच सत्ता
हुकुमाचा पत्ता I त्येच्या हाती

हुईलच कवा I सातबारा कोरा
घोसनाचा वारा I नीरा पये

वटलेच नाई I दुस्कायाचे चेक
पंचनामे फेक I सदाईचे

डीजीटल केलं I पाकीट पैश्याचं
ठुवा चीचोकेचं I खीस्यामंदी

कसी खोय मोळ I केली राज्या तुही
माजवली दुही I भोगआता

रवींद्र अंबादास दळवी नाशिक

Share

प्रतिक्रिया