नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

तु जान माणसा, सुजान माणसा

Dr. Ravipal Bharshankar's picture
काव्यप्रकार: 
कविता

तु जान माणसा, सुजान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||धृ||

शेतक-याची बैलगाडी
लुळी- पांगळी झाली
वादळ वारा काळ पेटला
कोणी नाही वाली
अश्रृ ढाळतो शेतकरी, दया न माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||१||

खेळ मांडुनी क्लुप्त्यांचा
करणी केली मोठी
पांढरपेश्या कावळ्यांनी
धरणी केली खोटी
अन्यायाने घोट घेतला, छान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||२||

लय वज केली मातीची
छातीला लावुनं
आयुष्याची माती झाली
शेतीला वाहूनं
शेतक-यांची सुळावरती, माण माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||३||

शेतक-यांच्या कामक-यांच्या
घामाचे खाऊनं
मातीला ही विसरूण गेले
ए सी तं राहूणं
शेतक-यांचे नाही कुणाला, भान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||४||

भूमातेच्या पदरी केली
शेती लाजवंती
ओठ आपले हाय म्हणावे
आपल्याच दंती
शेतक-यांनी काय करावे, दान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||५||

Share

प्रतिक्रिया

  • Nilesh's picture
    Nilesh
    बुध, 04/01/2017 - 21:10. वाजता प्रकाशित केले.

    सुंदर


  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    शुक्र, 08/09/2017 - 19:28. वाजता प्रकाशित केले.

    Thanks

    Dr. Ravipal Bharshankar


  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    गुरू, 05/01/2017 - 18:05. वाजता प्रकाशित केले.

    वास्तववादी कवीता सुजान मानसा

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक


  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    शुक्र, 08/09/2017 - 19:28. वाजता प्रकाशित केले.

    Thanks

    Dr. Ravipal Bharshankar


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 19/02/2018 - 22:03. वाजता प्रकाशित केले.

    सुरेख कविता. पुढील लेखनास शुभेच्छा!
    बहुधा तुम्ही वर्धा किंवा नागपूर संमेलनात सादर केली होती, असे आठवते.
    सादरीकरण सुद्धा उत्तमच झाले होते. Thumbs-Up

    शेतकरी तितुका एक एक!


  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    शनी, 03/03/2018 - 11:22. वाजता प्रकाशित केले.

    मी ही कविता वर्धेत सादर केलेली. आपल्या पहिल्या अ. भ. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात.

    Dr. Ravipal Bharshankar