पोटातले पाणी

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

ढग फुटून वर्षे गेली, पाण्याच्या डोळ्यात येईल पाणी
जरा कळ सोस वो माँ नदिले येईलच पाणी

शेतकऱ्यांनो थांबा जरा, कशाची आली घाई
स्वागताची होर्डिंग्ज पोहचलीत ना गावोगावी
टिव्हीत पहा नदि भराले टाईम लागतोय बाई
जोतीष्य सांगे पाचव्या वर्षी नक्की शिरवा येइ
ठाव हाय ना तुमाले पहिल्यांदा जमिनीत मुरते पाणी

काय हाये पाण्याला फुटल्या दिशा दहाही
त्यातच कावळ्यांचे प्रयोग काही नविन नाही
नुसत्या दगडधोंड्यानीच नदि भरत राही
पाण्यावरच पोट त्यांच, धार कशी वाही
धीर धर मराच्या पैले पे बीसलरीतल घोटभर पाणी

राज्यकर्ते हाये का भिकारी, कळत नाही
उधारीवर सारा देश चालवत राही
उत्पादकाचे हात का इथे बांधल्या जाई
व्यवस्था कृषकाची तळमळून पाही
वर्षानुवर्षे सरकारच्या पोटातलं हलत नाही पाणी

प्रतिक्रिया

ravipal bharshankar's picture

खुप छान!!!

Ravipal Bharshankar

Dhirajkumar Taksande's picture

डॉ. साहेब आपले खूप खूप आभार!

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! CongratsCongrats

PREMRAJ LADE's picture

छान