आता पेटवा मशाली

Sushant Barahate's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

आता पेटवा मशाली

खुप झाल्या बाता, आता वेळ आली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

एकच भिती आता, वादळाची वेळ आली
डोळया समोर माझ्या, भुई सपाट झाली
पुरात पिक जाता, सख्खाही बघतो खाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

घरात आमच्या आता, अशी अवकळा आली
आजारी असतो पिता, आई कधिच गेली
सनात आमच्या आता, ताटही असते खाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

करुन भाकड बाता, अशी कमाई केली
कुनी झाले नेता, काही बनले वाली
हाती येताच सत्ता, तुलाच विसरुन गेली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

साथ कुनाची आता, आम्हीच सोडुन दिली
हिंमत लक्षात येता, किंमत खरी कळाली
दुखाच सावट असता, हसु असुद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

प्रतिक्रिया

Dhirajkumar Taksande's picture

दुखाःचे सावट असता, हसु असूद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली
अप्रतिम रचना सुशांत! अभिनंदन!

Dhirajkumar Taksande's picture

दुखाःचे सावट असता, हसु असूद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली
अप्रतिम रचना सुशांत! अभिनंदन!

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! CongratsCongrats

विनिता's picture

सुरेख रचना

Sushant Barahate's picture

धन्यवाद मॅडम....

Sushant Barahate's picture

धन्यवाद धीरज साहेब....