वारसा

Dhirajkumar Taksande's picture

कंटाळून कर्जाला बाप एड्रीन पेउन मेला
धुरजड बंडीचा जु मानेवरती टाकून गेला

भुईसपाट शेतीत डोंगर कर्जाचा निंघाला
वारसाहक्कान नशीबी त्यास बहाल केला

पहिल्या दुष्काळात सुख लागले पळायला
कुणी म्हटले याला अनुवांशीक रोग झाला

आपल्या शस्त्रांना भाग पडले विकायला
आशेवर जगण्याशिवाय उपाय ना राहिला

व्यवस्थेचा ढग तर विनाकारण गडगडला
अश्रुलाही स्वार्थ्यांनी स्वतः साठीच राखला

बापा प्रमाणे आता मीही आलो खपायला
असा हा वारसा नको कुणासाठी जपायला

लेखनविभाग: 
गझल
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! CongratsCongrats