नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

जगवा किसान आता

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

हो सज्ज कापणीला झाले निदान आता ।
त्या माजल्या चितांनी सजवू स्मशान आता ।।१।।

बसवू जरा तडाखा काचेतल्या जिवांना ।
समतेच्या स्वागताला उठवू तुफान आता ।।२।।

फुक बीगुल आक्रोशाचा कानात यंत्रणेच्या ।
शब्दास जागवाया मिटवू विधान आता ।।३।।

धोका जरा कळू द्या या श्वेत संस्कृतीला ।
नटविण्या राजधानी रक्ताचे निशाण आता ।।४।।

दाखवा धार शस्त्रांची त्या शोषक सत्तेला ।
सरड्यांची पलटणारी कापू जबान आता ।।५।।

गळफास पडावा येथे श्वासांच्या विक्रेत्यांना ।
मयतांच्या व्यापाऱ्यांचे जाळू दुकान आता ।।६।।

पेरणीस भाग पाडा तो गर्भ प्रजासत्तेचा ।
जगण्यास सृष्टी सारी जगवा किसान आता ।।७।।

Share

प्रतिक्रिया