कर्जमृत्यु

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

प्रत्येक हंगाम शेतकऱ्यांना नाचवतो आहे ।
त्याचं त्याला माहीत भाकर कशी पाचवतो आहे ।।१।।

मरता मरता जगण्याच्या स्वातंत्र्य युद्धात रोजच ।
आश्वासनाच्या गोळ्या छाताडात साचवतो आहे ।।२।।

चौफेर होणाऱ्या आस्मानी सुलतानी हमल्यातून ।
चक्रव्यूहात अभिमन्यूगत स्वतःला वाचवतो आहे ।।३।।

कुणी करावी वीरमरणाची व्याख्या बांधावा स्तंभ ।
सिध्द झालाच कर्जमृत्यू तरच चेक वटवतो आहे ।।४।।

संतांच्या भूमीत संवेदनशीलतेचा एवढा दुष्काळ ।
त्याचा दयामृत्यू देशाच्या महानतेला लाजवतो आहे ।।५।।

निर्लज्ज यंत्रणा करु पाहते तुला शेतीतून हद्दपार ।
तीचेच अंगाईगीत पुन्हा तू कशाला वाजवतो आहे ।।६।।

अंगारमळ्यातला स्फुलिंग, तो नकोच विझायला ।
वाघ रानातला पिंजऱ्यात नसल्याच भासवतो आहे ।।७।।

प्रतिक्रिया

ravipal bharshankar's picture

सुंदर गझल..

Ravipal Bharshankar

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! CongratsCongrats

प्रदीप थूल's picture

अंगारमळ्यातला स्फुलिंग, तो नकोच विझायला
वाघ रानातला पिंजऱ्यात नसल्याच भासवतो आहे..
अतिशय सारगर्भित असे काव्य!

Pradip