नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं'

विनिता's picture
लेखनप्रकार: 
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
कवितेचे रसग्रहण

कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं'

कधी कधी आपल्याला कल्पना नसतांना किंवा पुरेशी कल्पना नसतांना म्हणूयात, समोरुन वेगाने काहितरी येवून आपटते. आपण भांबावतो, दचकतो. थोडे सावरुन काय आदळले याचा शोध घेवू लागतो. ती वस्तू काय आहे हे बघितल्यावर कधी कधी स्वत:शीच हसतो आणि विसरुन जातो. पण किती ही विसरले म्हटले तरी ती आदळण्याची क्रिया मनांत कुठेतरी घर करुन बसते, मधेच डोके वर काढते.

असाच अनुभव आला, जेव्हा मी एक मराठी चित्रपट पाहिला 'गोष्ट छोटी..डोंगराऐवढी'

शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चित्रपट बनला आहे असे त्याबद्दल ऐकले होते. पण प्रोमो वगैरे काही बघितला नव्हता. जुने ग्रामीण चित्रपट मनांत होते. तसेच काहीतरी असेल असे वाटून बघायला बसले आणि अक्षरशः अतंर्बाह्य हादरुन गेले. वास्तव ऐवढे भीषण असेल याची पुसटशी ही कल्पना मनाला नव्हती. हा चित्रपट पहातांना मी हूंदके देवून रडले. वाटले, ' काय करु या माझ्या भावांसाठी / त्यांच्या मागे राहिलेल्या उघड्या कपाळांच्या लक्ष्म्यांसाठी / भांबावलेल्या त्या निष्पाप चिल्यापिल्यांसाठी!'

हा चित्रपट, त्यातले काळजात कालवाकालव करणारे संवाद आणि आतड्याला पीळ पडेल अशी आर्त स्वरांत गायलेली गाणी! हि गाणी नाहित, त्या शेतकर्‍यांच्या रक्ताने लिहिलेली त्यांच्या फुटक्या नशीबाची गाथाच आहे. यातलेच एक गीतः

मातीत जगनं, मातीत मरनं
आपुल्या हातानं रचलं सरनं

काळी माय....शेतकर्‍याची आई! तो इथेच जन्माला येतो, राबतो आणि त्याच मातीत मिसळून जातो. पण आता हे मिसळणे नैसर्गिक राहिलेले नाही. तो स्वत:ला संपवतोय. त्या काळ्या आईच्या कुशीत!

रातदीन राबुनीया, जीवाचा पाचोळा
बोलनारा झाला मुका, आवळला गळा

बारा महिने / चोवीस तास राबून हि हातांत काहि उरत नाही. आणि अशा गांजलेल्या जीवाची किंमत ती काय? आणि अशांच्या आयाबहिणींची किंमत ती काय? धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर इज्जतीशी खेळावे.

तो बोलतो, आवाज उठवतो म्हणून त्याला कोंडीत पकडायचे. आवाज आपोआप बंद होतो. एकाची अशी अवस्था केली की बाकीचे निमूटपणे गप चालू लागतात.

आतड्याला पीळं तरीही, वडायची गाडी
छोटी कशी झाली गोष्ट्....डोंगराऐवढी!

अर्धपोटी राहून शेतीसाठी बियाणे आणायचे, पेरायचे आणि उद्याची वाट पहायची. जणू बी नाही, स्वप्नेच पेरायची. पिकं येईल, पैसा येईल, कर्ज उतरेल आणि मग जरा सुखाचा घास खाता येईल या आशेवर....निव्वळ आशेवर आजचा दिवस ढकलायचा. असा एक एक दिवस म्हणत उभे आयुष्य जाते आणि तुम्हांला हि फक्त एका दिवसाची गोष्ट वाटतेय!

अंधारुन आली कशी, घरामंदी रात
राबनारा गेला, मातीच्या भावांत

सगळे मार्ग खुंटले की एकच मार्ग उरतो.... सगळे संपवणे! तो तर संपून जातो. पण मागे उरलेल्यांचे काय? त्या बंद दारामागे असलेली ती कोणाची पत्नी / बहिण/ आई असली तरी जगासाठी फक्त 'मादी' असते. ओरबाडायला सुलभ असलेली! तिच्या बे-ईज्जतीचा जाब कोण विचारणार? तो तर सगळं उघड्यावर टाकून अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय.

ईस्कटुन गेली सारी, संसाराची धडी
छोटी कशी झाली गोष्ट्....डोंगराऐवढी!

घरातला कर्ता गेला कि सगळेच विस्कळीत होते. मोत्याची माळ तुटून मोती विखरावे तसे! जाणारा जातांना त्या घरांच घरपणंच घेवून जातो. मागची पिढी / पुढची पिढी दिशाहिन होते. मधला सांधाच निखळला तर कणा ताठ कसा राहिल? तीन पिढ्या उध्वस्त होतात आणि तुम्हांला हि फक्त एका माणसाची आत्महत्या वाटतेय!

- विनिता माने - पिसाळ
पुणे

Share

प्रतिक्रिया

 • Nilesh's picture
  Nilesh
  मंगळ, 27/09/2016 - 20:52. वाजता प्रकाशित केले.

  सुरेख


 • विनिता's picture
  विनिता
  बुध, 28/09/2016 - 09:36. वाजता प्रकाशित केले.

  धन्यवाद निलेशजी Smile


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 29/09/2016 - 12:07. वाजता प्रकाशित केले.

  प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
  अभिनंदन....! CongratsCongrats

  शेतकरी तितुका एक एक!


 • Raj Pathan's picture
  Raj Pathan
  गुरू, 29/09/2016 - 18:13. वाजता प्रकाशित केले.

  आपले कवितेचे रसग्रहण खूप आवडले.... गोष्ट छोटी डोंगराएवढी किंवा असे अनेक चित्रपट येऊन आणि शेतकऱ्याला प्रचंड केविलवाणा प्राणी दाखवून गेले! हे हि नसे थोडके! अभिनन्दन तथा शुभेच्छा.....

  धन्यवाद


 • विनिता's picture
  विनिता
  शुक्र, 30/09/2016 - 11:36. वाजता प्रकाशित केले.

  मुटे सर आणि पठाण सर, धन्यवाद Ramram

  खरं तर चित्रपट गीताचे रसग्रहण करावे की नाही असा विचार करत होते. Headack
  पण या चित्रपटापेक्षा दुसर्‍या कुठल्याही गीताचे रसग्रहण करावे असे वाटले नाही. False
  काहीतरी करावे वाटतेय पण काय? हेच उमगत नाहीये Sad